ताज महाल माहिती मराठी | Taj Mahal information in marathi

Taj Mahal information in marathi : जसं आपण भारताच्या आग्रा शहराचे नाव घेतो तेव्हा सर्वात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर ताज महाल. पांढऱ्या संगमरवरी दगडांनी बनवलेला आणि प्रेमाची निशाणी असलेला हा महाल आहे. ताज महाल मुगल शासक शहाजहानने बनवला होता. आजच्या या पोस्टमध्ये आपण ताज महाल माहिती मराठी (Taj Mahal information in marathi) जाणून घेणार आहोत.

Taj Mahal information in marathi
ताज महाल माहिती मराठी (Taj Mahal information in marathi)

ताज महाल माहिती मराठी (Taj Mahal information in marathi)

ठिकाण ताज महाल
स्थान आग्रा, उत्तर प्रदेश, भारत
निर्मिती 1932-1953
वास्तुविशारदउस्ताद अहमद लाहुरी
पर्यटक तीस लाख (प्रतिवर्ष)
ताज महाल माहिती मराठी (Taj Mahal information in marathi)

ताजमहाल जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये ताज महाल खूप प्रसिद्ध आहे. लाखो करोडो पर्यटक ताजमहाल पाहण्यासाठी येतात. असं म्हटलं जातं की ही पूर्ण अतिउत्तम कृती पूर्ण झाल्यानंतर शहाजहानने सर्व कारागिरांचे हात कापले होते. कारण अशी कलाकृती दुसरी कोणीही उभारू नये असं त्याला वाटत होतं. 

आपल्यापैकी सर्वजणांनी ताजमहाल विषयी थोडं बहुत ऐकलं असेल. जे लोक ताजमहाल पाहून आले असतील त्यांना पुन्हा परत पाहण्याची इच्छा असेल आणि जे लोक ताजमहाल अजून पाहिले नसतील त्यांना ताज महाल पाहण्याची इच्छा असेल. आज आपण ताज महाल विषयी संपूर्ण माहिती पाहूया.

ताजमहाल हा मोगल स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. त्याची आर्किटेक्चरल शैली पर्शियन, ओट्टोमन, भारतीय आणि इस्लामिक आर्किटेक्चरच्या घटकांची एक अनोखी संमिश्रता आहे. 1983 मध्ये, ताजमहाल युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ बनले. यासह, हे जागतिक वारसामध्ये प्राप्त झालेल्या सर्वोत्कृष्ट मानवी कार्यांपैकी एक म्हणून वर्णन केले गेले आहे. ताजमहाल हा देखील इस्लामिक आर्ट ऑफ इंडियाचा रत्नजडित घोषित करण्यात आला आहे.प्रतिवर्षी सुमारे तीस लक्ष पर्यटक ताज महालाला भेट देतात. (Taj Mahal mahiti marathi)

ताज महाल कोठे आहे (Where is Taj Mahal in Marathi)

आपल्या भारताच्या उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरामध्ये यमुना नदीच्या किनारी ताजमहाल वसला आहे. ताजमहल हा मुगल शासक शहाजान ने आपली पत्नी मुमताज महल हिच्या आठवणीसाठी बांधला आहे.

मुमताज महल कोण होती (Mumtaj Mahal Information in Marathi)

1 सप्टेंबर 1593 मध्ये जन्माला आलेली आणि 17 जुन 1631 मध्ये मृत्यू पावलेली मुमताज महल ही पर्शिया या देशाची राजकुमारी होती. जिने भारताच्या मुगल शासक शहाजानशी लग्न केलं होतं. मुमताज महल शहाजान ची सर्वात आवडती पत्नी होती. ते सर्वात जास्त मुमताज महाल वर प्रेम करत होते. सन 1630 मध्ये 37 व्या वर्षी आपल्या चौदाव्या मुलीला गोहरा बेगमला जन्म देताना मुमताज महल चा मृत्यू झाला.

ताज महाल चा इतिहास (History of Taj Mahal in Marathi)

ताजमहाल बनवण्याचा पूर्ण श्रेय पाचवे मुगल शासक शहाजहानला जातं. शहाजान ने भारतावर 1628 पासून 1658 पर्यंत राज्य केलं. शहाजान दे आपल्या सर्व पत्नीमध्ये सर्वात आवडती पत्नी मुमताज महल हीच्या आठवणीमध्ये ताजमहाल बनवला होता.

ताज महाल ला मुमताजचा मकबरा असेसुद्धा म्हणतात. मुमताज महल यांच्या मृत्यूनंतर शहाजान खूप विचित्र वागू लागला होता. तेव्हा आपल्या प्रेमाला जिवंत ठेवण्यासाठी आपल्या पत्नीच्या आठवणीमध्ये त्यांनी ताजमहल बनवण्याचा निर्णय घेतला. सन 1631 नंतर शहाजान ने अधिकारीक रूपामध्ये ताजमहाल निर्माण करण्याची घोषणा केली. आणि 1632 मध्ये ताजमहाल बांधण्याचे काम सुरू झालं.

ताजमहाल बनवण्यासाठी खूप वेळ लागला होता. तसं तर या मकबऱ्याच पूर्ण काम 1643 मध्ये पूर्ण झालं होतं. परंतु यानंतर त्याच्या सर्व भागांचे काम करण्यासाठी जवळजवळ दहा वर्षे लागली होती. संपूर्ण ताजमहालच बांधकाम 1653 मध्ये जवळजवळ 320 लाख रुपयांमध्ये पूर्ण झालं होतं. ज्याची आजची किंमत 52.8 अरब रुपये म्हणजे 827 मिलियन डॉलर आहे.

ताजमहल बनवण्यासाठी 20000 कारागिरांनी मुगल शिल्पकार उस्ताद अहमद लाहौरी याच्या हाताखाली काम केले होते. म्हणतात की ताज महाल बांधून पूर्ण झाल्यानंतर शहाजानने सर्व कारागिरांचे हात कापले होते.

ताजमहाल वरील विविध भाग

ताज महल बनवण्यामध्ये मुमताज महल हा मुख्य मकबरा आहे. याच्या मुख्य कक्षामध्ये शहाजहान आणि मुमताज महल यांची समाधी आहे. यांना खूप चांगल्या प्रकारे सजवले आहे. ताज महाल चे विविध भाग पडतात ते भाग पुढील प्रमाणे:

1) मकबरा
2) गुबंद
3) छतरियाँ
4) कळस
5) मिनार

ताजमहालावरील लेख

जसं आपण ताजमहालाच्या प्रवेशद्वारामधून प्रवेश करतो तसं आपल्याला त्या प्रवेशद्वारावर हा सुंदर लेख पाहायला मिळतो : “हे आत्मा ! तू ईश्वर के पास विश्राम कर, ईश्वर के पास शांति के साथ रहे तथा उसकी पूर्ण शांति तुझ पर बरसे.” ताजमहाल वरील सर्व लेख फ्लोरिड ठुलूठ लिपि मध्ये लिहिलेले आहेत. या सर्व लेखांचे श्रेय फारसी लिपिक
अमानत खां यांना जातं.

ताजमहाला शी संबंधित काही अफवा

अफवा : ताजमहाल रंग बदलतो.
सत्य : ताजमहाल रंग बदलत नाही. सूर्याच्या सूर्यप्रकाशामुळे ताजमहाल चमकतो. आणि रात्री चंद्राच्या प्रकाशामुळे ताजमहाल चा रंग बदललेला आपल्याला दिसतो.

ताजमहाला वरील आम्लवर्षा

ताजमहाल आग्रा मध्ये स्थित आहे. आग्रा मध्ये खूप कारखाने आणि पावर प्लांट आहेत, ज्या मधूनच घातक रासायनिक पदार्थ निघतात. हे आणलं हवेबरोबर मिळून क्रिया करून आम्ल वर्षासाठी सहाय्यक होतात. ही आम्लवर्षा ताजमहालच्या संगमरवरी दगडावर (कॅल्शियम कार्बोनेट) पडल्यानंतर त्यावर क्रिया करते. या क्रियेमुळे या अद्वितीय इमारतीला हानी पोहोचत आहे.

या आम्लवर्षा मुळे पांढरा संगमरवरी दगड पिवळा पडू लागला आहे. ज्यामुळे ताजमहालाचे सौंदर्य बिघडू लागले आहे. शेवटी एवढेच म्हणेल की आम्लवर्षा चा प्रभाव रोखण्यासाठी जास्त प्रमाणात झाडे लावणे गरजेचे आहे आणि कारखान्या मधून निघणारे घातक रासायनिक पदार्थ रोखले पाहिजे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

ताजमहाल कोणी बांधला?

भारतातल्या अधिकृत इतिहासानुसार, मुघलसम्राट शहाजहाँने त्याची राणी मुमताज महलच्या स्मृती जपण्यासाठी ताजमहाल बांधला होता.

ताजमहाल कोणत्या खंडात आहे?

ताजमहाल आशिया खंडात आहे.

आग्रा कोणत्या राज्यात आहे?

उत्तर प्रदेश

आग्रा शहराची स्थापना कोणी केली?

सिकंदर लोधी याने आग्रा शहराची स्थापना केली.

आग्रा येथील ताजमहाल कोणाशी संबंधित आहे?

मुघल सम्राट शाह जहान ह्याने आपली पत्नी मुमताज महलच्या मृत्यूनंतर तिच्यासाठी एक स्मारक म्हणून 1653 साली ताजमहालाची निर्मिती केली.

आग्रा हे शहर कोणत्या नदीवर आहे?

यमुना नदीवर आग्रा हे शहर आहे.

ताजमहल चा प्रमुख वास्तुविशारद कोण होता?

ताजमहल चा प्रमुख वास्तुविशारद उस्ताद अहमद लाहुरी होता.

निष्कर्ष (Summary)

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण ताजमहाल माहिती मराठी (Taj Mahal information in marathi) जाणून घेतली. तुम्हाला Taj Mahal in marathi ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Comment