प्रेम म्हणजे काय | What is love in marathi

What is love in marathi : प्रेम ही एक प्रकारची भावना आहे. प्रेमाला अनेक रूपे आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण प्रेम म्हणजे काय (What is love in marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

प्रेम म्हणजे काय (What is love in marathi)

प्रेम म्हणजे काय (What is love in marathi)

कोणत्याही प्राण्यांशी, वस्तू, सजीव, निर्जीव, इत्यादीबद्धल मनामध्ये आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, आदर, निर्माण होने आणि ती गोष्ट सहवासात, जीवनात हवीशी वाटणे म्हणजे प्रेम.

आपले दैनंदिन जीवन जगत असताना सहवासात येणाऱ्या कोणत्याही गोष्टीशी भावनिक, मानसिक, शारीरिक, संबंध जोडले गेल्यामुळे निर्माण झालेला स्नेह म्हणजे प्रेम.

“प्रेम” हा शब्द एक असा शब्द आहे ज्याच्या नावाने आपल्याला छान वाटते, प्रेम हा शब्द आहे ती भावना जी आपण कधीही गमावू इच्छित नाही. या शब्दात अशी सकारात्मक ऊर्जा आहे जी आपल्याला मानसिक आणि आंतरिक आनंद देते. सामान्यत: प्रेम ही अशी भावना असते जी एखाद्या माणसाला दुसऱ्या माणसाबद्दल वाटते.

प्रेमात असण्याचे सात टप्पे असतात. पहिले आकर्षण, दुसरे विचार, तिसरी भेटण्याची इच्छा, चौथी, एकत्र राहण्याची इच्छा, पाचवा भेटण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न, सहावा एकत्र व्यक्त होण्याचा, सातवा एकत्र आयुष्य जगण्याचा प्रयत्न आणि शेवटी आयुष्याचा जोडीदार बनणे

प्रेमाची वयोगटानुसार स्वरूपे

1) स्नेह – प्रेमाचा हा प्रकार आपण आपल्याहून वयाने लहान असणाऱ्या व्यक्तीसोबत ठेवतो. यात एक काळजी किंवा माया असते. भूतदया किंवा पशुपक्षांबद्दल वाटणारी आपुलकी हीसुद्धा ह्यात मोडते.

2) प्रेम – हा समान वयोगटातील व्यक्तींच्या दरम्यान असणाऱ्या संबंधांना दर्शवितो – ह्याचे उपप्रकार म्हणजे पत्नीप्रेम, भागीनिप्रेम, बंधुप्रेम, मित्रप्रेम इत्यादी.

3) आदर – हा प्रेमाचा प्रकार आपल्याहून वयाने मोठ्या अथवा ज्येष्ठ व्यक्तींकरता असतो. ह्यातही संबंधित व्यक्तीची वाटणारी काळजी – विशेषतः त्यांच्या आवडी-निवडी व विचारांची ठेवतात. ही वागणूक त्यांच्या जीवनाच्या अनुभवाची आणि त्यांनी आपल्या केलेल्या संगोपनाबद्दलची एक पावती आणि क्वचित प्रसंगी त्यांना आवडणाऱ्या शिस्तबद्ध दिनचर्येची दखल असू शकते. पण हे सर्व प्रेमच!

4) ममता – हा तो प्रेमप्रकार की ज्याला अनुभवायला असे म्हणतात की देवही अवतार घेतात. स्त्रीला मातृत्व प्राप्त झाले की आपल्या बाळासाठी वाटणारे प्रेम म्हणजे ममता होय.

5) भक्ती – प्रेमाचे परमोच्च रूप की ज्याचे वर्णन केवळ अशक्य. परमेश्वर आणि साधक जेंव्हा एकरूप होतात तेंव्हा जो प्रेमप्रकार घडतो तो म्हणजे भक्ती – भक्ती म्हणजेच एकरूपता. भिन्नता म्हणजे विभक्ती- परमेश्वर आणि भक्त दोघेही एकरूप होऊन आपापले वेगळे अस्तित्व घालवून परमोच्च एकरूपता अनुभवतात त्यासच भक्ती असे संबोधन आहे.

6) एकरुपता – प्रेम म्हणजे दोन जीव, नाते, संबंधी, एकत्र येऊन विचाराची देवाण घेवाण करतात, त्याच्या विचारातील एकता म्हणजे प्रेम होय.

सारांश

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमधे आपण प्रेम म्हणजे काय (What is love in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. Prem mhanje kay ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Comment