Red Fort information in marathi : दिल्लीचा लाल किल्ला भारतामध्ये दिल्ली शहरातील ऐतिहासिक किल्ला आहे. लाल किल्ला भारतामध्ये पर्यटकांसाठी एक खास आकर्षण आहे. दुसऱ्या देशातून येणारे पर्यटक सुद्धा भारताच्या लाल किल्ल्याला पाहणे खूप पसंद करतात. लाल किल्ल्याविषयी बोलायचं झालं तर तुम्हाला सांगू इच्छितो की 1856 पर्यंत या किल्ल्यावर जवळजवळ दोनशे वर्ष मुघलांचे राज्य होतं. हा किल्ला दिल्लीच्या केंद्रामध्ये स्थित आहे. जर तुम्ही लाल किल्ला पाहण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे प्रसिद्ध स्थळ आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण लाल किल्ला माहिती मराठी (Red Fort information in marathi) जाणून घेणार आहोत.
Contents
- 1 लाल किल्ला माहिती मराठी (Red Fort information in marathi)
- 2 लाल किल्याचा इतिहास (History of Red Fort in Marathi)
- 3 लाल किल्ल्यावरील प्रमुख आकर्षण (Attractions of Red Fort in Marathi)
- 4 लाल किल्ला पाहण्यासाठी प्रवेश शुल्क
- 5 लाल किल्ला पाहण्यासाठी वेळ
- 6 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
- 7 निष्कर्ष (Summary)
लाल किल्ला माहिती मराठी (Red Fort information in marathi)
ठिकाण | लाल किल्ला |
स्थान | जुनी दिल्ली, भारत |
निर्माण | 12 मे 1639 – 6 एप्रिल 1648 |
वास्तुकार | उस्ताद अहमद लाहोरी |
प्रकार | सांस्कृतिक |
लाल किल्ला हा दिल्लीतील एक प्रसिद्ध मुघलकालीन किल्ला आहे. याचे नाव लाल संगमरवरी दगडावरून पडलेले आहे. हा किल्ला यमुना नदीच्या किनारी बांधला गेला आहे. दिल्लीच्या ऐतिहासिक, जुन्या दिल्ली भागात लाल किल्ला लाल वाळूचा खडकांनी बनलेला आहे. हा किल्ला पाचव्या मुघल बादशहा शाहजहांने बांधला होता. या ऐतिहासिक किल्ल्याची 2007 साली युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून निवड केली होती.
हा किल्ला आणि राजवाडा हा शहजानाबाद मध्ययुगीन शहराचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. लाल किल्ल्याची योजना, व्यवस्था आणि सौंदर्य हे मुगल सर्जनशीलताचे शिरोबिंदू आहेत, जे शाहजहांच्या कारकिर्दीत शिखरावर पोहोचले. या किल्ल्याचे बांधकाम झाल्यानंतर स्वतः शाहजहांने बरीच विकास कामे केली. औरंगजेब आणि शेवटच्या मोगल राज्यकर्त्यांनी बरेच विकासकाम केले.
लाल किल्ल्यात उच्च दर्जाचे कला आणि कलाकारांचे कार्य आहे. इथली कलाकृती पर्शियन, युरोपियन आणि भारतीय कला यांचे संश्लेषण आहे, ज्याचा परिणाम विशिष्ट आणि वेगळी शाहजहानी शैली होती. रंग, अभिव्यक्ती आणि स्वरुपात ही शैली उत्कृष्ट आहे. लाल किला हा दिल्लीतील एक महत्त्वाचा इमारत गट आहे, ज्यामध्ये भारतीय इतिहास आणि त्याच्या कलांचा समावेश आहे. त्याचे महत्त्व काळाच्या मर्यादेपेक्षा अधिक आहे.लाल किल्ला माहिती मराठी (Red Fort information in marathI)
लाल किल्याचा इतिहास (History of Red Fort in Marathi)
भारतावर दोनशे वर्षापेक्षा जास्त काळ राज्य करणाऱ्या मुघल साम्राज्याचे पाचवे शहनशहा शहाजहानने लाल किल्ल्याला बांधले होते. शहाजान आपली राजधानी आग्रा पासून दिल्ली पर्यंत स्थानंतरण करत होते. आणि यामध्ये दिल्लीला येण्यापूर्वी शहाजहानने दिल्लीमध्ये एक किल्ला बांधण्याचा आदेश दिला. लाल किल्ला बांधण्याची सुरुवात 13 मे 1638 मध्ये झाली होती. यासाठी खास मोहरमचा दिवस ठरवला गेला होता.
लाल किल्ला ही वास्तू बनवण्यासाठी शहाजहाने वास्तुकार उस्ताद अहमद लाहोरी याला निवडले होते. तुम्हाला सांगू इच्छितो की ताजमहल ही वास्तू बांधण्यासाठी सुद्धा यांचीच निवड केली होती. शहाजान ला लाल रंग खूप आवडत होता. त्यामुळे दिल्लीच्या या किल्ल्याला लाल दगडांपासून बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि त्यामुळे याच नाव लाल किल्ला असं पडलं. शहाजान या किल्ल्याला आपल्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात बलवान बनवू इच्छित होता. त्यामुळे हा किल्ला पूर्ण बांधण्यासाठी त्यांनी जवळजवळ दहा वर्षे लावली.
सन 1648 मध्ये या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले. त्यावेळी किल्ल्याची शिल्पकारी आणि चमक बघून सर्वजण आश्चर्यचकित झाले. शहाजान चे पुत्र औरंगजेब सत्तेवर आल्यानंतर या किल्ल्याची चमक हळूहळू कमी होऊ लागली. त्यानंतर दर वर्षी लाल किल्ल्यावर अनेक वेळस हल्ले होऊ लागले. आणि यावर अनेक शासकांनी राज्य केलं. येथे लावलेली अनेक अनमोल रत्ने आणि किमती वस्तू इंग्रजांनी चोरून ब्रिटनमध्ये पाठवल्या. इंग्रजांच्या शासनानंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा लाल किल्ल्याला भारतीय पुरातत्व विभागाकडे सोपविण्यात आले. आज हाच किल्ला दिल्ली ची शान बनून उभा आहे.
लाल किल्ल्यावरील प्रमुख आकर्षण (Attractions of Red Fort in Marathi)
दिल्लीमध्ये स्थित लाल किल्ल्याकडे सर्वजण आकर्षित होतात. या किल्ल्याला लाल दगडांनी बनवलेल आहे. लाल किल्ल्यावर अशा प्रकारचे शिल्प बनवले गेले आहेत, जे पाहून सर्वांना आश्चर्य वाटेल. यमुना नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या या किल्ल्याची शान कधी कोहिनूर सुद्धा होता. ज्याला नंतर इंग्रजांनी चोरले. लाल किल्ल्यावर असणाऱ्या काही वस्तू आजही आकर्षणाचं केंद्र आहे. आज आपण त्या सर्वाविषयी माहिती जाणून घेऊ या.
1) लाहोरी गेट
हा लाल किल्ल्याचा मुख्य द्वार आहे. लाहोरी गेट हे नाव मुघल शासकाच्या काळामध्ये लाहोरच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी येथेच आपला स्वतंत्र ध्वज फडकवला होता. त्यानंतर दरवर्षी स्वातंत्र्य दिना दिवशी पंतप्रधानाद्वारे दरवर्षी तिरंगा फडकवला जातो.
2) दिल्ली गेट
दिल्ली गेटचे नाव भारताच्या राजधानीच्या नावावर ठेवण्यात आले आहे. हा गेट दक्षिण दिशेला सार्वजनिक प्रवेशद्वार आहे. हा गेट लाहोरी गेटच्या समान आहे. या गेटच्या दोन्ही बाजूला मोठ्या दगडांनी बनलेले हत्ती समोरासमोर उभे आहेत.
3) मुमताज महाल
हा महाल शहाजनने आपली प्रिय पत्नी बेगम मुमताज साठी बनवला होता. यामुळे या महालाला मुमताज महाल या नावाने सुद्धा ओळखतात. हा महाल पांढऱ्या संगमरवरी दगडांनी निर्माण केला आहे. आणि फुलांच्या आकृत्याचा आकार दिला आहे. या महाला मध्ये पहिला महिला राहत होत्या, आता याला संग्रहालयाच्या रुपामध्ये बनवल गेल आहे. या संग्रहालयामध्ये आपण तलवार, पेंटिंग, पोशाख आणि अन्य वस्तू पाहू शकतो.
4) रंग महाल
या महालाला पहिला पॅलेस ऑफ कलर्स या नावाने सुद्धा ओळखत होते. शहनशहा ने या विशेष महालाला आपल्या राणी साठी बनवले होते. हा महाल खूप सुंदर आहे.
5) हिरा महाल
हिरा महालाला सम्राट बहादूरशहा द्वितीय याने खूप सुंदर आणि भव्य संगमरवरी दगडांनी बनवले आहे. काही इतिहासकारांच्या माहितीनुसार या महाला मध्ये सम्राट बहादुरशहा याने हिऱ्या पेक्षा जास्त किमती हिरा लपवला आहे, अशी माहिती दिली जाते.
6) चट्टा चौक
लाल किल्ल्याच्या लाहोरी गेट जवळ हा चट्टा चौक स्थित आहे. मुघल शासनाच्या काळामध्ये येथे बाजार भरत होता. या बाजारामध्ये महालात राहणाऱ्या लोकांसाठी रेशमी कपडे आणि अन्य किमती वस्तू विकल्या जात होत्या.
लाल किल्ला पाहण्यासाठी प्रवेश शुल्क
लाल किल्ल्या मध्ये भारतीय लोकांना प्रवेश करण्यासाठी फक्त 35 रुपये द्यावे लागतात. आणि विदेशी लोकांना प्रवेश करण्यासाठी 500 रुपये द्यावे लागतात. येथे 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. लाल किल्ल्यामध्ये संध्याकाळी लाईट आणि साऊंड शो सुद्धा असतात, हे पाहण्यासाठी आपल्याला वेगवेगळी तिकीटे घ्यावी लागतात. भारतीय लोकांसाठी शनिवारी आणि रविवारी हे लाईट शो पाहण्याची फी 80 रुपये असते. आणि मंगळवार पासून ते शुक्रवार पर्यंत या शो ची फी 60 रुपये असते.
लाल किल्ला पाहण्यासाठी वेळ
जर तुम्ही लाल किल्ला पाहण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छितो की, सकाळी 09:30 पासून ते संध्याकाळी 04:30 पर्यंत किल्ला उघडा असतो. लाल किल्ल्यामध्ये आपण मंगळवार पासून ते रविवार पर्यंत फिरू शकतो. सोमवारी हा किल्ला बंद असतो. लाईट शो संध्याकाळी सात वाजता सुरू होतो. इंग्रजी आणि हिंदी भाषेचा लाईट शो वेगवेगळ्या वेळी असतो. (Lal kila information in marathi)
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
लाल किल्ला कोठे आहे?
लाल किल्ला दिल्ली येथे आहे.
लाल किल्ला कोणी बांधला?
लाल किल्ला पाचवा मुघल बादशहा शाहजहांने बांधला आहे.
निष्कर्ष (Summary)
मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण लाल किल्ला माहिती मराठी (Red Fort information in marathi) माहिती जाणून घेतली. लाल किल्याचा इतिहास (History of Red Fort in Marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.