marathi vinod : नमस्कार मित्रांनो, मजेत आहात ना. आजच्या या लेखामध्ये आपण काही मराठी विनोद (Marathi vinod) जाणून घेणार आहोत. हे विनोद वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच खूप हसू येईल.
मराठी विनोद (Marathi vinod)
1) सर : काय रे बंडया शाळेचा Time 7 वाजता चा आहे आणि तू 8 वाजता येतो .
.
.
.
.
.
.
.
.
.
बंडया : सर तुम्ही माझी वाट नका बघत जाऊ,
शिकवायला सुरवात करत जा.
2)
वर्गणीवाले : काका, स्मशानभूमीच्या कुंपणाकरीता वर्गणी द्या…….
काका : कशाला हा उपद्व्याप…..काहीही कुंपण नको…. आत गेलेला काही बाहेर येत नाही……आणि बाहेरच्याला आत जायची इच्छा नाही…..
😂😂😂😂😂
स्थळ सांगायलाच पाहिजे का ???😜😜
3)
मी जेव्हा लहान होतो तेव्हा
मोठ्यांची लग्न व्हायची..
आता मी मोठा झालोय तर
आता लहाणांची लग्न होतं
आहेत.
🤪🙄😱🙄😱😝😱🤪😱🤪😱🤪😱
4)
जगातील ४ काम
जी अवघड आहेत.
१. मुंगीला लिपस्टिक लावणं.
.
२. हत्तीला मांडीवर बसवणं.
३. मच्छरला कपडे घालणं.
४. बायकोची समजूत काढणं.
😝😨🙄🥶🙄😨🤪😨
5)
नातू आजीला –“आजी, आजी तू
नाटकात काम करतेस का?”
आजी — “नाही! पण तुला कुणी
.
सांगितलं कि मी नाटकात काम
करते?”
नातू – “दुपारी तू मंदिरात गेली
होतीस ना, तेव्हा आई आपल्या
मैत्रिणींना सांगत होती कि
आजकाल म्हातारी खूपच नाटकं
करायला लागलीय!”
😝😀😀🙄😝🙄😨😨😱😝😱😝😱😝😱
6)
😆मराठीचा नादखुळा 😆
मास्तर वर्गात तोंडी परीक्षा घेत असतात…
——————“-“——–“”——–
मास्तर – कावळा सरळ का उडतो?
संतोष – कारण तो विचार करतो की
उगाचच… “का-वळा”? 😂
📼📼📼📼📼📼📼📼
मास्तर – जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल?
:
:
संतोष – फुल भाजी
📼📼📼📼📼📼📼📼📼
मास्तर – होटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाही ?
..
संतोष – कारण तीकडे वाढायला वेटर्स असतात ना… 😜😄😄😄
📼📼📼📼📼📼📼📼📼
मास्तर – भारत सोडून जाणार्या माणसाला काय म्हणाल ?
संतोष – हिंदुस्तान लिव्हर
😎😎😎😎
📼📼📼📼📼📼📼📼📼
मास्तर – हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते..
संतोष – कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात
😜😜😜😁😁😁😂😂
📼📼📼📼📼📼📼📼
मास्तर – हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
संतोष – ओला होईल
😎😜😜😂😂😂
📼📼📼📼📼📼📼📼📼
मास्तर – जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात ती वेळ कुठली असते ?
संतोष – घड्याळ दुरुस्त करण्याची !
✋✋✋😅😅😂😂
📼📼📼📼📼📼📼📼📼
मास्तर – रावणाच्या लंकेला “सोन्याची लंका” का म्हणतात???
संतोष – कारण लहानपणी रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने “सोन्या” म्हणायचे… 😂😂😂😂😂
📼📼📼📼📼📼📼📼📼
मास्तर – 🍋जर मँगो फ्लेवर चा चहा बनवला तर त्याला काय म्हणाल
संतोष – आमटी 🍵 ……
💦💦💦💦💦💦
मास्तर गायब झाले……
😂😂😂😂😂😂😜😝😛
[😜😜😜😜😜
गुरुजि :- बंड्या … आज डब्याला
काय आणल आहेस…..
बंड्या :- गुरुजी.. पुरणपोळी
आणली आहे …
गुरुजि :- मला देशील का तुझा
डबा … मी आज डबा
आणला नाही …
बंड्या :- हो देईन….
गुरुजि :- पण तुझ्या आई न
विचारल्यावर काय
सांगशील..
बंड्या :- सांगीन कुत्र्या ने खाल्ला
म्हणून….
😂😂😂😂😂😂. मास्तर नी लोळवुन लोळवुन मारला 😂😂😂😂
😂😜😳
7)
चला मंडळी
मूड फ्रेश करा
😍😍😍😍
निरनिराळ्या लोकांनी सांगितलेल्या खोट्या गोष्टी
१) जिवलग मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट- ती तुझ्याकडेच बघतेय
२) बस कंडक्टर ने सांगितलेली खोटी गोष्ट- मागची गाडी रिकामी आहे, त्यात बसा
३) आईबाबांनी सांगितलेली खोटी गोष्ट- फक्त दहावीपर्यंत अभ्यास कर, नंतर मज्जाच मज्जा
४) सर्वांनीच सांगितलेली खोटी गोष्ट- घर, गाडी आपण एकदाच घेतो, त्यामुळे पैशाचा विचार करू नको
६) नव्याने नोकरीला लागलेल्या मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट- पगार कमी आहे, पण शिकायला खूप मिळतं
७) बॉसने प्रमोशन नाकारताना सांगितलेली खोटी गोष्ट- मी तुझ्यासाठी खूप भांडलो, पण काही उपयोग झाला नाही
८) मुलगी बघायला गेल्यावर सासरच्यांनी सांगितलेली खोटी गोष्ट- पोहे मुलीनेच बनवलेत
९) मुलाने लग्नाआधी मुलीला सांगितलेली खोटी गोष्ट- मी Occasionally ड्रिंक्स घेतो
१०) पारितोषिक वितरणाच्या वेळी परीक्षकांनी सांगितलेली खोटी गोष्ट- माझ्यासाठी सर्वच जण विजेते आहेत
११) कपड्याच्या दुकानातील सेल्समनने सांगितलेली खोटी गोष्ट- हा रंग तुमच्यावर उठून दिसतो
१२) “टेबल पार्टनर” ने सांगितलेली खोटी गोष्ट- बिअर म्हणजे दारू नव्हे
आणि सर्वात कळस म्हणजे
१३) नवर्याने बायकोला सांगितलेली खोटी गोष्ट
तू माहेरी गेलीस की मला मुळीच चैन पडत नाही.😂
🤣🤣🤣
8)
बायको: (बाथरूम मधून लाडिक आवाजात) अहो मी साबण लावलाय जरा तुमच्या मजबूत हातानी चोळून देता का?
नवरा: आलो आलो आलो आलोच (पेपर वाचता वाचता तडक बाथरूम कडे धाव घेऊन आत घुसतो)
बायको: अहो ह्या बादलीभर कपड्याना साबण लावून ठेवलाय. नीट रगडून धुवा. मला स्वंयपाकाचं काम आहे मी जाते.
9)
एक गाढव मरून पडले होते.
पुणेकराने म्युनिसीपाल्टीला
फोन लावला – “अहो इथे एक गाढव मरून पडले आहे.”
उत्तर आले – “मग आम्ही काय करू ? “
पुणेकर
“काही करू नका, मेल्यावर नातेवाईकांना कळवायची पद्धत असते,
म्हणून फोन केला.”
🤣🤣😂😂😂😛😛😛😜😜😜
10)
जे लोक बघेल तेव्हा
ब्लूटूथ वाले हेडफोन गळ्यात
अडकवलेले दिसतात त्यांना बघुन
असं वाटत की,
यांनी मोबाईल सोबत लग्न करून
त्यांच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात
बांधल आहे….
😝😨🙄🤪🥶🤪🥶🤪🥶🥳🥶🤪🥶🤪
सारांश
तर मित्रांनो आजच्या या लेखात आपण मराठी विनोद (Marathi vinod) जाणून घेतले. आशा करतो की तुम्हाला हे विनोद नक्कीच आवडले असतील. जर तुम्हाला हे विनोद आवडले असतील तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.