माझ्याप्रमाणेच शिक्षक करेक्ट कार्यक्रम करतील : एकनाथ शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – शिक्षक हे आईवडिलांनंतर मुलांवर संस्कार करण्याचे काम करतात. मार्गदर्शनाचेदेखील ते काम करत असतात. त्यामुळे शिक्षक करेक्ट कार्यक्रम करत असतात. तसाच करेक्ट कार्यक्रम मी दोन वर्षांपूर्वी केला होता. यंदाच्या निवडणुकीतदेखील ते तसाच कार्यक्रम करतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारासाठी शिक्षण संस्थांच्या बैठकीत केला.

आपल्याला जसा शेतकरी महत्त्वाचा असतो तसाच शिक्षकही महत्त्वाचा असतो. देशाची सुजाण सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम शिक्षक करतो. ही निवडणूक सर्वांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर शिक्षकांच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

शिक्षक जिंदगी के साथ भी….

शिक्षक हे एलआयसीसारखे आहेत. ‘जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी’ अशी शिक्षकांची भूमिका असते. लोकसभेत काय झाले त्यातून शिकू आणि राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार आणू, असेदेखील शिंदे यांनी यावेळी सांगितले.

गोडसेंना उमेदवारी देण्यात उशीर

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबत बोलताना शिंदे यांनी आमच्याकडून काही चुका झाल्यात. उमेदवारांच्या नावाची अदलाबदल झाली. त्यात हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर करण्यात उशीर झाला. तसेच काही आपलेच मध्ये निवडणुकीसाठी उभे राहिले, अशी कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली.

हेही वाचा:

Leave a Comment