अलेक्झांडर द ग्रेट सिकंदर चे 30 प्रेरणादायी सुविचार मराठी | Alexander the great quotes in marathi

Alexander the great quotes in marathi : अलेक्झांडर द ग्रेट म्हणजेच सिकंदर ज्याला आज आपण विश्व विजेता म्हणून ओळखतो त्यांनी फक्त 33 वर्षाच्या आयुष्यात संपूर्ण विश्वावर आपले वर्चस्व गाजवले. सिकंदरचा जन्म २० जुलै इसवीसन पूर्व 356 मध्ये झाला होता. तो मेसेडोनिया चा राज्यकर्ता होता.

जागतिक इतिहासात सिकंदर सर्वात यशस्वी व कुशल सेनापती पैकी एक गणला जातो. त्या काळात यात असलेले संपूर्ण जग त्याने जिंकले होते. आणि त्यामुळे तो जगजेता म्हणून ओळखला जातो. आजच्या या लेखामध्ये आपण अलेक्झांडर द ग्रेट सिकंदर चे 30 प्रेरणादायी सुविचार मराठी (Alexander the great quotes in marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

अलेक्झांडर द ग्रेट सिकंदर माहिती मराठी (Alexander the great quotes in marathi)

नावअलेक्झांडर द ग्रेट सिकंदर
जन्म 20 जुलै इ.स.पू. 356
मृत्यू11 जून इ.स.पू. 323
वडील फिलिप दुसरा, मॅसेडोन
आई ऑलिंपियास
अलेक्झांडर द ग्रेट सिकंदर माहिती मराठी (Alexander the great quotes in marathi)

सिकंदर हा मॅसेडोनियाचा राज्यकर्ता होता. जागतिक इतिहासात तो सर्वांत यशस्वी व कुशल सेनापतींपैकी एक गणला जातो. तत्कालीन ग्रीक संस्कृतीला त्या काळात ज्ञात असलेले संपूर्ण जग त्याने जिंकले आणि त्यामुळे तो जगज्जेता म्हणूनही ओळखला जातो.

आपल्या कारकिर्दीत त्याने इराण, सीरिया, इजिप्त, मेसोपोटेमिया,फिनीशिया, जुदेआ, गाझा, बॅक्ट्रिया तसेच भारतातील पंजाबपर्यंतचा प्रदेश जिंकला. फारसी दस्त ऐवजांनुसार त्याला एस्कंदर-इ-मक्दुनी (मॅसेडोनियाचा अलेक्झांडर) म्हटले जाते. तर उर्दू आणि हिंदी दस्तऐवजांत त्याला सिकंदर-ए-आझम म्हटले गेले आहे.

Alexander the great quotes in marathi
अलेक्झांडर द ग्रेट सिकंदर चे 30 प्रेरणादायी सुविचार मराठी (Alexander the great quotes in marathi)

अलेक्झांडर द ग्रेट सिकंदर चे 30 प्रेरणादायी सुविचार मराठी (Alexander the great quotes in marathi)

मी मेंढराच्या नेतृत्वाखाली असलेल्या, सिंहाच्या सैन्याला घाबरत नाही.

पण मला सिंहाच्या नेतृत्वाखाली असलेल्या मेंढराच्या सैन्याची भीती वाटते.

जो प्रयत्न करेल, त्याच्यासाठी अशक्य असे काहीच नाही.

 

लक्षात ठेवा प्रत्येकाच्या आचरणावर सर्वांचे भवितव्य अवलंबून असते.

जीवनासाठी मी माझ्या वडिलांचा ऋणी आहे. पण चांगल्या जीवनासाठी मी माझ्या गुरूंचा ऋणी आहे.

आपल्या तलवारीने आपण जे काही, मिळवतो ते निश्चित किंवा शाश्वत असू शकत नाही. परंतु दयाळूपणा आणि संयमाने मिळवलेले प्रेम निश्चित आणि टिकाऊ असते.

ज्याच्यासाठी संपूर्ण जग पुरेसे नव्हते, त्याला आता फक्त एक कबर पुरेशी आहे.

स्वर्ग दोन सूर्यांना सहन करू शकत नाही आणि पृथ्वी दोन स्वामींना सहन करू शकत नाही.

मला असे वाटते की तुम्ही परिश्रमपूर्वक प्रयत्न केल्यास तुम्हाला यशाच्या शिखरावर जाण्याचा मार्ग सापडेल.

मी शस्त्रास्त्रांपेक्षा तत्त्वज्ञानाच्या सर्वोच्च रहस्यांच्या ज्ञानात श्रेष्ठ बनणे पसंत करेल.

मी युद्धात मारले गेलो असतो तर माझ्यासाठी किती चांगले झाले असते, माझ्या मित्राच्या क्रोधाला बळी पडण्यापेक्षा शत्रूच्या हातून मरण पावणे अधिक चांगले झाले असते.

ज्ञानाशिवाय कौशल्यावर लक्ष केंद्रित करता येत नाही. कौशल्याशिवाय शक्ती येत नाही आणि शक्ती शिवाय ज्ञान लागू होऊ शकत नाही.

मानव जातीच्या प्रत्येक पिढीमध्ये सतत भीती सोबत युद्ध होत आलेले आहे, ज्यांच्यात भीतीला जिंकण्याची हिंमत आहे, त्यांना मुक्त केले जाते आणि ज्यांना भीती जिंकते त्यांना भीतीला हरवण्याचे धैर्य होईपर्यंत त्रास सहन करावा लागतो किंवा तोपर्यंत जोपर्यंत त्यांचा मृत्यू येत नाही.

खऱ्या प्रेमाचा शेवट कधीच सुखी नसतो. कारण खऱ्या प्रेमाचा अंत कधीच होत नसतो.

माझे शरीर दफन करा आणि कोणतेही स्मारक बांधू नका. माझे हात बाहेर ठेवा, जेणेकरून लोकांना कळेल की ज्याने जग जिंकले त्याचा मृत्यू झाला, तेव्हा त्याच्या हातात काहीच नव्हते.

शेवटी सर्व संपल्यानंतर तुम्ही काय केले आहे हेच महत्त्वाचे असते.

अंधकाराच्या दीर्घायुष्यापेक्षा मी गौरवाचे लहान आयुष्य जगणे पसंत करेल.

योग्य दृष्टिकोन, योग्य वृत्ती असेल तर स्वतः लागलेल्या मर्यादा नाहीशा होतात.

परिश्रम आणि जोखीम ही वैभवाची किंमत आहे. पण धैर्याने जगणे आणि निरंतर टिकणारी किमती मागे सोडून मरणे, ही एक सुंदर गोष्ट आहे.

प्रत्येक दिसणारा प्रकाश हा सूर्य नसतो.

मोठा विचार कराल तरच, काहीतरी मोठे साध्य करू शकाल.

मी माझ्या विजयासाठी कधीही फसवणूक करत नाही.

आपण असे व्यक्ती बनूया की सर्व लोक आपले मित्र बनतील आणि सर्वजण आपले शत्रू बनायला घाबरतील.

आपण कोणाचेही गुलाम बनायला नाही पाहिजे. आपण आपले जीवन मुक्तपणे निर्भय बनवायला पाहिजे. कारण हे करण्याची क्षमता आपल्या सर्वांमध्ये असते.

माझ्या आजूबाजूला डॉक्टर असूनही मी मरत आहे. आपल्याला मृत्यूच्या जबड्यामधून कोणीही वाचू शकत नाही.

शंभर वर्षे घाबरून जगण्यापेक्षा न घाबरता एक दिवस जगणे गर्भाची गोष्ट आहे.

चांगले नाव कमावण्यासाठी मला किती कष्ट घ्यावे लागले, हे फक्त मलाच माहित आहे.

आपले ध्येय हे गोष्टींना सोपे करणे नसून, लोकांना मजबूत करणे हे असले पाहिजे.

निष्कर्ष

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण अलेक्झांडर द ग्रेट सिकंदर माहिती मराठी (Alexander the great quotes in marathi) जाणून घेतली. अलेक्झांडर द ग्रेट सिकंदर चे 30 प्रेरणादायी सुविचार मराठी (Alexander the great quotes in marathi) तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Comment