आत्मविश्वास सुविचार मराठी

आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. समाधान हा सर्वात मोठा खजिना आहे. आत्मविश्वास हा सर्वात मोठा मित्र आहे.

जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुमच्या स्वप्नांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही.

वेळ लागला तरी चालेल, पण आयुष्यात काहीतरी बनून दाखवा, कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस? हे नाही तर, तू काय करतोस? हे विचारतात……

कोणीही तुमच्यासोबत नसेल, तर घाबरुन जाऊ नका कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात.

काही वेळा स्वतःला प्रेरित करण्यासाठी फक्त तीनच शब्दांची गरज असते. ‘हो, मी करू शकतो.

आत्मविश्वास हा सुर्यासारखा असतो, तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक चमकेल.

कष्ट अशी चावी आहे, जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते.

पैज लावायची च असेल तर स्वतःसोबत लावा, जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल.