सुशांत सिंह राजपूत विषयी माहिती | Sushant Singh Rajput information in marathi

Sushant Singh Rajput information in marathi : बॉलीवूड मधील एक प्रसिद्ध आणि सर्वांचे आवडते अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी चित्रपटांमध्ये येण्याअगोदरच आपले स्थान प्रत्येक घरामध्ये निर्माण केलं होतं. तुम्हाला सांगू इच्छितो की हा सतत हसत असणारा अभिनेता 14 जून 2020 ला आपल्या सर्वांना सोडून कायमचा निघून गेला. हा एक असा अभिनेता होता जो कोणत्याही गॉडफादरच्या मदतीशिवाय इथपर्यंत झाला होता. आजच्या या पोस्टमध्ये आपण सुशांत सिंह राजपूत विषयी माहिती (Sushant Singh Rajput information in marathi) जाणून घेणार आहोत.

सुशांत सिंग राजपूत आता आपल्यामध्ये नाहीत, परंतु त्यांच्या आठवणी त्यांचे फॅन्स आणि त्यांना पसंद करणाऱ्या लोकांमध्ये कायम राहतील. चला तर मग आपण सुशांत सिंह राजपूत विषयी काही माहिती (Sushant Singh Rajput information in marathi) जाणून घेऊ या.

Sushant Singh Rajput information in marathi

सुशांत सिंह राजपूत विषयी माहिती (Sushant Singh Rajput information in marathi):

  • नाव : सुशांत सिंह राजपूत
  • जन्म : 21 जानेवारी 1986 (पाटणा)
  • मृत्यू : 14 जून 2020 (मुंबई)
  • उंची : 1.78 मीटर
  • आवडता रंग : काळा
  • आवडता खेळ : क्रिकेट, फुटबॉल, टेनिस
  • आवडता क्रिकेटर : सौरव गांगुली

सुशांत सिंग राजपूत यांचे काही टीव्ही कार्यक्रम (Sushant Singh Rajput TV show in Marathi):

  • 2008-2009 : किस देश मे है मेरा दिल
  • 2009-2011 : पवित्र रिश्ता
  • 2010-2010 : जरा नचके दिखा (सीजन 2)
  • 2010-2011 : झलक दिखला जा 4

सुशांत सिंग राजपूत याचे काही चित्रपट (Sushant Singh Rajput Movies in Marathi):

  • 2013 : काय पो छे!
  • 2013 : शुद्ध देसी रोमांस
  • 2014 : पीके
  • 2015 : डिटेक्टिव ब्योमकेश बक्शी
  • 2016 : एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी
  • 2017 : राब्ता
  • 2018 : वेलकम टू न्यू यॉर्क
  • 2018 : केदारनाथ
  • 2019 : सोनचिड़िया
  • 2019 : छिछोरे
  • 2019 : ड्राइव
  • 2020 : दिल बेचारा

सुशांत सिंह राजपूत विषयी काही आश्चर्यकारक रोचक तथ्य (Amazing facts about Sushant Singh Rajput in Marathi) :

1) सुशांत सिंह राजपूत यांचा जन्म 21 जानेवारी 1986 ला भारताच्या पटना बिहार राज्यामध्ये झाला होता.

2) सुशांत सिंह राजपूत यांना चार बहिणी आणि सुशांत सिंग एकमेव मुलगा होते. सुशांत सिंह राजपूत यांचे वडील एक गव्हर्मेन्ट एम्प्लॉयी आहेत. सुशांत सिंह जेव्हा बारावीला होते तेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता. ते आपल्या आईवर खूप प्रेम करत होते.

3) सुशांत सिंह आपल्या शेवटच्या काही दिवसांमध्ये आपल्या आई बद्दल खुप आठवण काढत होते. याचा अंदाज तुम्ही त्यांच्या शेवटच्या इंस्टाग्राम पोस्टवरून लावू शकता. आईसाठी त्यांनी खूप सुंदर कविता सुद्धा पोस्ट केली होती.

4) सुशांत सिंह अभ्यासामध्ये सुद्धा खूप हुशार होते. ते Engineering Entrance Exam मध्ये टॉप 10 विद्यार्थ्यांपैकी एक होते. याबरोबरच सुशांत सिंह यांनी  भौतिकशास्त्र या विषयांमध्ये International Physics Olympiad परीक्षेमध्ये सुद्धा टॉप केलं होतं.

5) सुशांत सिंह जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा त्यांचे मन अचानकपणे डान्सिंग आणि एक्टिंग कडे वळले.  तेव्हा त्यांना वाटू लागले की आता आपण डान्सर किंवा एक्टर बनुया. यामुळे सुशांत सिंह राजपूत च्या इंजिनिअरिंगच्या अभ्यासावर खूप वाईट प्रभाव पडला. त्यामुळे त्यांनी तिसऱ्या वर्षी इंजिनिअरिंग कॉलेज सोडले. आणि डान्सिंग आणि एक्टिंग मध्ये करियर करण्यास सुरुवात केली.

6) मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी काही डान्स ग्रुप सुद्धा जॉईन केले.

7) खूप लोकांना असे वाटते की सुशांत ने त्याचा पहिला ड्रामा ‘पवित्र रिश्ता’ मध्ये केला होता. परंतु हे सत्य नाही. ‘किस देश मे है मेरा दिल’ या सीरियल पासून सुशांतने आपली सुरुवात केली होती.

8) नाटक सिरीयल मध्ये काम केल्यानंतर सुशांतने आपलं पाऊल बॉलीवूड कडे वळवलं. 2013 मध्ये त्यांनी ‘काय पो छे’ या बॉलिवूड चित्रपटासाठी डेबू केला होता. आणि तो लोकांना खूप पसंद सुद्धा आला होता.

9) त्यानंतर 2013 मध्ये परत त्याने शुद्ध देशी रोमान्स ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर रॅण्डम देशी रोमान्स हे शीर्षक दिले गेले, या चित्रपटाने लोकांच्या मनामध्ये जागा निर्माण केली.

10) 2014 मध्ये सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट पिके मध्ये सुद्धा सुशांतने काम केले होते.

11) आणि 2016 मध्ये प्रकाशित झालेली बॉलिवूड बायोपिक ‘एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ यासाठी सुशांतला खूप मेहनत करावी लागली. एका रिपोर्टनुसार सुशांत सिंग ने महेंद्रसिंग धोनी प्रमाणे परफॉर्म करण्यासाठी महेंद्रसिंग धोनी कडून एक वर्ष ट्रेनिंग घेण्यासाठी त्यांच्या बरोबर एक वर्ष घालवले होते. परंतु या चित्रपटानेच सुशांतला खूप मोठे केले.

निष्कर्ष :

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण सुशांत सिंह राजपूत विषयी माहिती (Sushant Singh Rajput information in marathi) माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Comment