सोनू सूद विषयी माहिती | Sonu Sood information in marathi

नमस्कार मित्रांनो, सोनू सूद ह एक भारतीय अभिनेता आहे. जो बॉलीवूड, हॉलिवूड मध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम करतो. तो अनेक जाहिराती मध्ये सुद्धा आपल्याला दिसतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण सोनू सूद विषयी माहिती (Sonu Sood information in marathi) जाणून घेणार आहोत. 

सोनू सूद विषयी माहिती (Sonu Sood information in marathi)

सोनू सूद विषयी माहिती (Sonu Sood information in marathi):

  • 1973 या वर्षी पंजाबच्या मोगा येथे जन्म झाला. 
  • मोगा येथील सॅक्रेड हर्ट स्कूल आणि नागपुरातील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (YCCE) येथे शिक्षण घेतले. 

चित्रपटाची सुरुवात:

  • 1999: या वर्षी तामीळ चित्रपट ‘कल्लाझगार’ने त्याची ओळख झाली.
  • 2000: या वर्षी तेलुगु चित्रपट ‘हँड्स अप!’ मध्ये त्याने व्हिलनची भूमिका पार पाडली.
  • 2002: मध्ये, ‘शहीद-ए-आजम’ मध्ये बिग स्क्रीनवर प्रथम दिसले.
  • 2006: मध्ये आलेला ‘रॉकीन’ मीरा हा पहिला इंग्रजी चित्रपट
  • 2015: 2015 या वर्षी त्याने ‘चीनी मॅडेरिन ‘ भाषेतील चित्रपट ‘झुआनझांग’ मध्ये काम केले.
  • 2016: मध्ये प्रॉडक्शन हाऊस सुरु केले, त्याचे नाव आपल्या वडिलांच्या नावावर ठेवले. ‘शक्ती सागर प्रॉडक्शन’. 

रिअल लाईफ, व्हिलन ते खऱ्या आयुष्यातील सुपरहिरो:

कोरोना काळाच्या सुरुवातीपासूनच सोनू सूद लाखो लोकांसाठी सुपरहिरो ठरला आहे. त्याने हजारो स्थलांतरित रोज मजुरी कामगारांना मदतीचा हात देण्यासोबतच, वैद्यकीय मदत, रोजगार देण्याचे कामही सोनू सूदने केले.

सोनू सूद विषयी माहिती (Sonu Sood information in marathi)

भुकेल्यांना अन्न देणे:

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात अनेक मजुरांनी रोजगार गमावला. त्यांना जेवण पुरवण्यासाठी शेतकरी शक्ती सागर सूद यांच्या नावाने अन्नदान सुरु केले. या उपक्रमांतर्गत मुंबईत दररोज 45,000 लोकांना भोजन दिले जाते.

एसडीजी स्पेशल ह्यूमॅनिटेरियन ऍक्शन अवार्ड: 

सप्टेंबर 2020 मध्ये, सोनू सूद याची ‘एसडीजी स्पेशल ह्यूमॅनिटेरियन ऍक्शन अवार्ड’ साठी निवड झाली. कोरोना काळात मानवतावादी कार्य केल्याबद्दल संयुक्त राष्ट्र संघाच्या डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत हा पुरस्कार घोषित झाला.

मॅन ऑफ द इअर 2020:

लाखो लोकांना मदत केल्याबद्दल सोनू सूद याला 2021 मध्ये ‘मॅन ऑफ द इअर’ पुरस्कार देण्यात आला.

रोजगारातून लोकांना सक्षम बनविणे:

आपल्या 47व्या वाढदिवसानिमित्त सोनू सूदने एक फ्री ॲप आणि वेबसाईट आणले, या माध्यमातून त्याने कंपन्यांशी संपर्क साधून स्थलांतरित मजूरांना रोजगार देण्याचे काम केले.

सोनूला कोणी प्रेरित केले?

सोनूने आपल्या आई- वडीलांपासून प्रेरणा घेतली. त्याने त्याच्या आईला गरीब विद्यार्थ्यांची मोफत ट्यूशन घेतांना पाहिले. त्याने आपल्या वडीलांना कपड्याच्या दुकानातून लंगरचे आयोजन केलेले पाहिले.

सोनू सूदला समर्पित मंदिर: 

सोनू सूदने केलेल्या मानवतावादी कार्याची ओळख लक्षात घेऊन त्याच्या चाहत्यांनी तेलंगाणाच्या सिद्दीपेट येथे त्याचे मंदिर बांधले. तेथील डुब्बा थंडा या गावातील लोकांनी खऱ्या आयुष्यातील हिरो म्हणून त्याचे मंदिर उभारले.

ट्रोल्स, द्वेष:

सोनू सूद यांना ट्रोल केले गेले आणि काही लोकांकडून त्यांच्या सार्वजनिक कामासाठी त्याचा द्वेष केला गेला परंतु देशभरातील कोट्यवधी लोकांचे कौतुक व त्यांचे समर्थन लाभले. मला या पृथ्वीवर पाठविण्यात आले आहे आणि एका उद्देशाने, मी माझे कार्य सुरु ठेवेल, असे सोनूने त्याच्याविरुद्धच्या ऑनलाइन द्वेषाबाबत म्हटले आहे.


निष्कर्ष: 

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण सोनू सूद विषयी माहिती (Sonu Sood information in marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. 

Leave a Comment