शब्दांच्या जाती मराठी व्याकरण | shabdanchya jati marathi vyakaran

shabdanchya jati : मित्रांनो इयत्ता चौथी पासून ते स्पर्धा परीक्षे पर्यंत सर्वांना मराठी व्याकरण विचारले जाते. मराठी व्याकरण मध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. त्यातीलच एक म्हणजे शब्दांच्या जाती. आजच्या या पोस्टमध्ये आपण शब्दांच्या जाती (shabdanchya jati) जाणून घेणार आहोत. 

shabdanchya jati

शब्द म्हणजे काय?

शब्द हा वाक्यातील महत्वपूर्ण घटक आहे. कोणत्याही अर्थपूर्ण वर्ण समूहाला शब्द असे म्हणतात.

उदाहरणार्थ- म + ग + र = मगर

म, ग, र ही अक्षरे क्रमाने आली आहेत. त्यामुळे त्याला अर्थ प्राप्त झाला आहे. 

शब्दांच्या जाती (shabdanchya jati)

शब्दांच्या जाती म्हणजेच शब्दांचे प्रकार होय. वाक्यात जे शब्द येतात त्यांची वेगवेगळ्या प्रकारची कार्ये असतात त्यांच्या कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत त्याला शब्दांच्या जाती असे म्हणतात.

शब्दांच्या जातीचे दोन प्रकार पडतात : 

1) विकारी शब्द 

2) अविकारी शब्द 

1) विकारी शब्द  

वाक्यात उपयोगात येतांना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्तीने बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात.

थोडक्यात – विकारी म्हणजे बदल घडणारे. 

विकारी शब्दांच्या जाती 

 1. नाम 
 2. सर्वनाम 
 3. विशेषण 
 4. क्रियापद 

2) अविकारी शब्द  

वाक्यात उपयोगात येतांना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्तीने बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द असे म्हणतात.

थोडक्यात – अविकारी म्हणजे बदल न घडणारे. 

अविकारी शब्दांच्या जाती : 

 1. क्रियाविशेषण अव्यय
 2. शब्दयोगी अव्यय
 3. उभायन्वयी अव्यय
 4. केवलप्रयोगी अव्यय 

शब्दांच्या आठ जाती 

 1. नाम 
 2. सर्वनाम 
 3. विशेषण 
 4. क्रियापद 
 5. क्रियाविशेषण अव्यय
 6. शब्दयोगी अव्यय
 7. उभायन्वयी अव्यय
 8. केवलप्रयोगी अव्यय 

1) नाम 

प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्या वस्तूच्या गुणधर्माला दिलेल्या नावाला व्याकरणात ‘नाम’ असे म्हणतात. 

उदाहरणार्थ : गोपाल, सिता, नदी, पर्वत, अमृत, स्वर्ग, धैर्य, कीर्ती, आनंद. 

2) सर्वनाम 

नामाचा पुन्नरूच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. 

उदाहरणार्थ :  ते, त्यांनी, त्यांना, तो, ती, ते, त्या. 

3) विशेषण

नाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. 

उदाहरणार्थ :  चांगला, हिरवा. 

4) क्रियापद 

क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय. 

उदाहरणार्थ : 

(अ) भारताने क्रिकेट मॅच जिंकली. 

आ) गाय दूध देते.

क्रियापद : जिंकली, देते. 

5) क्रियाविशेषण अव्यय 

क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात त्यांना क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात. 

उदाहरणार्थ : राधिका मोठ्याने बोलते. 

क्रियाविशेषण अव्यय  : मोठ्याने

6) शब्दयोगी अव्यय

शब्दांना जोडून येणाऱ्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यये म्हणतात. शब्दयोगी अव्यये स्वतंत्र येत नाहीत. मुळची ही क्रियाविशेषणे असतात शब्दाला जोडून आल्यास शब्दयोगी अव्यये होतात. 

उदाहरणार्थ- पक्षी झाडावर बसला. 

शब्दयोगी अव्यय : वर 

7) उभयान्वयी अव्यय 

उभय म्हणजे दोन. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. 

उदाहरणार्थ : पहाट झाली आणि रस्त्यावर माणसे धावू लागली.

उभयान्वयी अव्यय  : आणि 

8) केवलप्रयोगी अव्यय 

मनातील आनंदाच्या, दुखाच्या, आश्चर्याच्या तिरस्काराच्या इ. प्रकारच्या उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दाला केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात. 

उदाहरणार्थ : ओहो! काय सुंदर देखावा आहे हा!

केवलप्रयोगी अव्यय : ओहो!

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1) अविकारी शब्द म्हणजे काय?

वाक्यात उपयोगात येतांना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्तीने बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द असे म्हणतात.

2) क्रिया बद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात?

क्रिया बद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय  क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. 

3) क्रियापदाचे किती प्रकार आहेत

क्रियापदाचे सात प्रकार आहेत. 

4) नामाचे किती प्रकार आहेत?

नामाचे तीन प्रकार आहेत. 

सारांश (Summary) 

आजच्या या पोस्टमध्ये आपण शब्दांच्या जाती (shabdanchya jati) विषयी माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. 

Leave a Comment