मित्रांनो एक काळ होता जेव्हा आपण सोशल मीडियाचा वापर मनोरंजनासाठी करत होतो. परंतु आता अनेक लोक सोशल मीडियाचा वापर करून आता पैसे कमवत आहेत. आजच्या या लेखामध्ये आपण इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे (How to earn Money from Instagram in Marathi) हे जाणून घेणार आहोत.

इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे | How to earn Money from Instagram in Marathi
मित्रांनो इंस्टाग्राम वरून पैसे कमवण्याचे तसे अनेक पर्याय आहेत. पण त्यासाठी आपल्याकडे एक इंस्टाग्राम अकाउंट असावे जे एकाच Niche वर कंटेंट टाकत असेल. आणि त्यावर काहीसे फोलोर्स सुद्धा असायला हवेत. जर तुमच्याकडे एकाच Niche वरील इंस्टाग्राम अकाउंट असेल आणि त्यावर जास्त फॉलोर्स असतील तर तुम्ही नक्कीच पैसे कमवू शकाल.
1) Sponsership :
मित्रांनो इंस्टाग्राम वर आपण सर्वात जास्त पैसे Sponsership वरून मिळवू शकतो. यामध्ये मोठमोठ्या ब्रँड्सचे काही प्रॉडक्ट्स आपल्याला स्पॉन्सर करावे लागतात आणि त्याबदल्यात आपल्याला पैसे मिळतात. जर आपले फालोर्स जास्त असतील तर आपल्याला Sponsership लगेच भेटेल आणि पैसे सुद्धा जास्त मिळतील. Sponsership घेण्यासाठी आपण ब्रांडसना संपर्क साधू शकतो.
2) ईबुक :
इंस्टाग्राम वर ईबुक विकून सुद्धा लोक खूप पैसे कमवत आहेत. यासाठी आपला जो Niche आहे त्या संबंधित एक ईबुक लिहावी लागेल. आणि त्याला Instamojo किंवा इतर कोणत्याही ठिकाणी विकण्यासाठी ठेवू शकतो. त्यामधून सुद्धा आपल्याला खूप पैसे भेटू शकतात पण आपली ईबुक सुद्धा तितकी ज्ञान देणारी असावी लागते.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल: व्हॉट्सॲप वरून पैसे कसे कमावे
3) पेज प्रमोशन:
पेज प्रमोशन हा सगळ्यांना माहीत असलेला इंस्टाग्राम वरून पैसे कमवण्याचा मार्ग आहे. यामध्ये आपल्या पेजवर दुसऱ्या एखाद्या पेजचे प्रमोशन करून आपण पैसे कमवू शकतो. आपल्या पेजचे जितके जास्त फोलोर्स् असतील तितके आपण जास्त पैसे यातून आपण कमवू शकतो.
4) Affiliate Marketing:
Affiliate Marketing हा मार्ग सुद्धा या काळात खूप प्रसिद्ध झाला आहे. म्हणजे आपण एखाद्या प्रॉडक्टची लिंक देतो आणि त्या लिंकवरून जर कोणी ते प्रॉडक्ट खरेदी केलें तर आपल्याला याचे कमिशन भेटते. इंस्टाग्राम वरून आपण Affiliate Marketing करून सुद्धा आपण खूप पैसे कमवू शकतो.
5) Content Writer :
जर तुम्ही एखाद्या Niche वर उत्तमरीत्या लिखाण करत असाल तर इंस्टाग्राम वरून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकतो. एखाद्या पेज साठी तुम्ही कंटेंट लिहून देऊ शकता आणि त्याबदल्यात तुम्हाला पैसे मिळतील.
6) इंस्टाग्राम पेज विकणे:
इंस्टाग्राम पेज विकणे हा नवीन प्रकार आता उदयास आला आहे. यामध्ये आपण एखादे पेज विकू शकतो आणि त्याबदल्यात आपल्याला पैसे मिळतात. आपल्या पेजचे जितके फॉलोर्स् जास्त असतील तितके आपल्याला जास्त पैसे मिळतील.
हे देखील पाहा – Girls Instagram Captions in Marathi
7) रेफर करून:
Refer and Earn याबद्दल तुम्हाला नक्कीच माहित असेल. यामध्ये आपण एखाद्या ॲपची रेफरल लिंक देतो आणि जर कोणीही त्या लिंक वरून ते ॲप डाऊनलोड केले तर त्याबदल्यात आपल्याला पैसे मिळतात. Upstox, Grow असे अनेक ॲप्स आहेत जे सर्वात जास्त पैसे मिळवून देतात.
8) फोटो विकून:
जर तुम्हाला फोटोग्राफीचा छंद असेल आणि तुम्ही सुंदर फोटो काढत असाल तर ते फोटो तुम्ही विकू शकता. आणि ते फोटो एखाद्या प्रोजेक्ट मध्ये वापरण्यासाठी विकू शकता. यासाठी Shutterstock, Picxy अश्या अनेक साईट आहेत ज्या आपल्याला भरपूर पैसे देतात.
9) अकाऊंट सांभाळणे:
अशी अनेक लोकं आहेत ज्यांना आपलं इंस्टाग्राम अकाउंट मोठ करायचं आहे पण त्यांच्याकडे वेळ नाही. त्यासाठी ते आपले अकाउंट देतात दुसऱ्यांना चालवण्यासाठी. यासाठी ते खूप पैसे सुद्धा देतात. आपण त्यांचं अकाउंट चालवून पैसे कमवू शकतो.
10) इंस्टाग्राम सर्व्हिसेस:
इंस्टाग्राम वरून आपण लोकांना वेगवेगळ्या सर्व्हिसेस देऊ शकतो. जसं की आपल्याला जर इंस्टाग्राम जर संपूर्ण माहिती असेल तर लोकांना आपण इंस्टाग्राम अकाउंट ग्रो कसं करावं यासाठी मार्गदर्शन करू शकतो. त्याबदल्यात आपल्याला पैसे मिळतात. जर तुम्ही कोणत्याही गोष्टी मध्ये एक्स्पर्ट असाल तर त्यासाठी तुम्ही लोकांकडून त्यासाठी पैसे चार्ज करू शकता.
तुम्ही आम्हाला सुद्धा इंस्टाग्राम वर फॉलो करू शकता:
निष्कर्ष:
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे (How to earn Money from Instagram in Marathi) ही माहिती जाणून घेतली. आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. अश्याच प्रकारच्या पोस्टसाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.
- मराठी, हिंदी आणि इंग्लिश निबंध वाचण्यासाठी GYANGENIX ला भेट द्या.
- 30 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य
- आश्चर्यकारक मराठी रोचक तथ्य, टेक्नॉलॉजी, करिअर याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी Talksmarathi ला भेट द्या.
- महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांबद्दल मराठीतून माहिती साठी SagaCrush मराठी या वेबसाइट ला भेट द्या.
Nice information …for helping this blog….