Amazing facts in Marathi : मित्रांनो आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये मराठी रोचक ते वाचायला खूप लोकांना आवडतात. आणि ही रोचक ते आपल्याला अनेक सोशल मीडियावरती सुद्धा पाहायला मिळतात. तुम्हालाही अशी रोचक तथे वाचायला नक्कीच आवडत असतील. म्हणून आजच्या या पोस्टमध्ये आपण मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (Amazing facts in Marathi) जाणून घेणार आहोत.
मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (Amazing facts in Marathi)
1) जगातील अनेक भागांमध्ये लोक लसूण टात्री उशीखाली ठेवून किंवा खिशात ठेवून झोपतात. याचे कारण असे सांगितले जाते की रात्री नेगेटिव एनर्जी पासून वाचण्यासाठी असे केले जाते. आणि यामुळे रात्री “चांगली झोप लागते असे सुधा सांगितले जाते.
2) जगातील सर्वात महाग चहा da hong pao हा आहे. याच्या दोन ग्राम चहाची किंमत जवळजवळ १ करोड रुपये आहे. आणि या चहाचे उत्पन्न केवळ चीन मध्येच होते.
3) मीडिया रिपोर्टनुसार, KGF स्टार यशजवळ गेल्या वर्षी पर्यंत 50 कोटींची संपत्ती होती.आणि अभिनेता यश एका चित्रपटासाठी 15 कोटींपर्यंत मानधन घेतो.
4) कॅलिफोर्नियामधील Craig Coleg या व्यक्तीला 39 वर्षापर्यंत तुरुंगामध्ये ठेवण्यात आले होते. परंतु ज्या गुन्ह्याखाली त्याला तुरुंगात ठेवले गेले होते तो गुन्हा म्हणजे हत्या त्याने केलेली नव्हती. 39 वर्षानंतर त्या व्यक्तीला निर्दोष म्हणून घोषित करण्यात आले. यानंतर सरकारने याला आपली चूक मानून त्याला बक्षिसाच्या रूपामध्ये 158 करोड रुपये दिले होते.
5) Lionel Messi च्या फॅन फॉलोइंग मुळे अर्जेंटिना देशातील सरकारने एक नियम बनवला आहे, त्या नियमानुसार तेथील कोणतीही व्यक्ती आपल्या मुलाचे नाव Messi ठेऊ शकत नाही. कारण त्यांना भीती वाटते कि भविष्यामध्ये या नावाची जास्त मुले झाली तर त्यांना ओळखणे अवघड जाईल.
- कैलास मंदिर वेरूळ माहिती मराठी (kailash mandir verul information in marathi)
- चिखलदरा संपूर्ण माहिती मराठी (chikhaldara marathi mahiti)
- मुंबईतील गिरगाव चौपाटी पाहण्यासारखी ठिकाणे व माहिती (Girgaon Chowpatty information in marathi)
6) हरियाणाच्या सोनीपत शहरामध्ये राहणारा दिपक जांगडा याला 11000 वॉल्ट विजेचा सुद्धा झटका लागत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतकी वीज पाचशे घरांमध्ये प्रकाश देऊ शकते. दिपकच्या शरीरावर अनेक वेळा प्रयोग झाले आहेत. तेव्हा त्याला कळले की विजेच्या झटक्याने त्याच्या शरीरावर कोणताच प्रभाव पडत नाही.
7) जगातील सर्वात महाग विकला जाणारा मासा हा अटलांटिक ब्लूफिन टूना आहे. या माशाची किंमत जवळजवळ 23 करोड रुपये आहे. या माशाची लांबी 3 मीटर आणि वजन जवळजवळ 250 किलो असते.
8) भारताचा प्रसिध्द टीव्ही शो तारक मेहता का उलटा चष्मा याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपले नोंदवले आहे. हा शो पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त वेळा टेलिकास्ट गेलेला शो आहे. हा शो जवळजवळ दहा वर्षापासून लोकांचे मनोरंजन करत आहे.
9) आपल्या भारत देशाच्या कसोल मध्ये स्थित फ्री कसोल कॅफेमध्ये भारतीय लोकांना जाण्यास मनाई आहे. या कॅफे मध्ये फक्त इजराइली लोक जाऊ शकतात. याचप्रमाणे चेन्नईमधील ब्रॉडलैंड्स लॉज फक्त विदेशी पासपोर्ट असणाऱ्या ग्राहकांनाच सेवा प्रदान करतो.
10) ऍपल कंपनीकडे त्यांची स्वतःची पोलिस टीम आहे. जीला वर्ल्डवाइड लॉयल्टी टीम असे म्हणतात. Apple की वर्ल्डवाइड लॉयल्टी टीम याची खात्री करते की अॅपल कंपनी मधून कोणीही काहीही माहिती लिक करत नाही. यासाठी ही कंपनी कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवते.
मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (Amazing facts in Marathi)
11) आपल्या भारत देशाच्या झारखंड राज्यातील बोकारो शहरापासून 27 किमी अंतरावर एक रहस्यमय कुंड आहे ज्याचे नाव दलाही कुंड आहे. या कुंडामध्ये टाळी वाजवल्यानंतर पाणी हळूहळू वर येऊ लागते. आणि हे पाणी वर येत असताना पाणी उकळत आहे असे वाटते.
12) स्पॅनिश फॅशन डिझाईनर मैनेल टोरेस याने जगातील सर्वात पहिला कपडे बनवणारा स्प्रे बनवला आहे. जो शरीरावर स्प्रे केल्यानंतर पंधरा मिनिटांमध्ये टी-शर्ट चे रूप घेतो. आणि या टी-शर्टला परत घालता येते आणि धुता सुद्धा येते.
13) स्विझरलँड मध्ये चोटरांना आपल्या घरापासून दूर ठेवण्यासाठी लोक नकली पोलीस गाड्या भाड्याने घेऊन आपल्या घरासमोर उभे करतात.
14) गाढवाच्या दुधाचे पनीर पूर्ण जगामध्ये सर्वात महाग विकले जाते. भारताच्या करन्सी प्रमाणे हे पनीर 78 हजार रुपये प्रति किलो विकले जाते. आणि हे पनीर युरोप खंडातील देश सब्रीया येथे मिळते. गाढवाच्या दुधामध्ये आईच्या दुधासमान गुण असतात असे मानले जाते.
15) व्हिएतनाम देशाच्या हनोई शहरामध्ये The Dolce Hanoi Golden Lake हॉटेल जगातील पहिले सोन्याचे हॉटेल आहे. ज्याला बनवण्यासाठी 11 वर्षे लागली होती. या हॉटेलमध्ये टॉयलेट पासून ते लॉबी, छत यावर सुद्धा सोन्याचा रंग दिला गेला आहे. येथे एक रात्र राहण्याचे भाडे 18600 रुपये आहे.
16) जगामध्ये सापाच्या जवळजवळ 2500 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. या मधील फक्त वीस टक्के प्रजाती या विषारी आहेत.
17) सोमालिया देशामध्ये समोसा खाण्यावर बंदी आहे. कारण समोसा चा आकार त्रिकोणी असतो आणि तेथील लोक त्रिकोण आकार आला ख्रिश्चन धर्माचे प्रतीक मानतात त्यामुळे तेथील सरकारने समोसे खाण्यावर बंदी घातली आहे.
18) फॉर्च्यूनने जारी केलेल्या भारतातील 50 शक्तिशाली महिलांच्या यादीत निर्मला सीतारमन अव्वल स्थानावर आहेत. याचबरोबर निर्मला सीतारामन फोर्ब्स 2020 च्या 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत समाविष्ट आहेत आणि जगातील शक्तिशाली महिलांच्या यादीत 41 व्या स्थानावर आहेत. भारताच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री आणि इंदिरा गांधींनंतर दुसऱ्या महिला अर्थमंत्री म्हणून सुद्धा त्यांना ओळखले जाते.
19) 2017 मध्ये 1 लाख 33 हजार लोकांनी, 2018 मध्ये 1 लाख 34 हजार लोकांनी, 2019 मध्ये 1 लाख 44 हजार लोकांनी, 2020 मध्ये 85 हजार लोकांनी आणि सप्टेंबर 2021 पर्यंत 1 लाख 11 हजार लोकांनी आपल्या भारताचे राष्ट्रीयत्व सोडून दुसऱ्या देशात राहण्याचा निर्णय घेतला आहे. या पाठीमागे काय कारणे असतील असे तुम्हाला वाटते?
20) जगातील सर्वात श्रीमंत गाव गुजरात च्या कच्छ जिल्ह्यात स्थित माधापर आहे. या गावामध्ये एकूण 7600 घटे आहेत आणि येथे एकूण 17 बँका आहेत. या 17 बँकांमध्ये 92000 लोकांचे 5000 कोटी रुपये जमा आहेत.
25 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (Amazing facts in Marathi)
21) जगातील सर्वात लहान पोपट Buff-faced Pygmy Parrot आहे. जो इंडोनेशिया आणि पापुआ न्यू गिनी येथे आढळतो. ज्याचे वजन फक्त 11.5 ग्रॅम असते.
22) इंडोनेशिया मध्ये स्थित KAWAHIJEN नावाची ज्वालामुखी जगातील एकमेव अशी ज्वालामुखी आहे जिचा रंग निळा आहे. रात्रीच्या वेळी या ज्वालामुखीवर निळ्या रंगाचा अद्भुत प्रकाश चमकत असतो. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की याचे कारण त्यामध्ये उपलब्ध असलेला सल्फ्यूटिक गॅस आहे. जो प्रत्येक वेळी लावा बरोबर जळत असतो.
23) जपान मधील वैज्ञानिकानी एक MRI मशीन यशस्वीपणे बनवली आहे. या मशीन च्या मदतीने आपण आपले स्वप्न रेकॉर्ड करू शकतो. आणि त्या स्वप्नाला आपण USB आणि Pendrive मध्ये रेकॉर्ड करून कॉम्प्युटर मध्ये पाहू शकतो.
24) एका रिपोर्टनुसार, उत्तर कोरिया मध्ये अमेरिकन चित्रपट पाहणाऱ्याला फाशीची शिक्षा दिली जाते. आणि भारतीय चित्रपट पाहणाऱ्याला तुरुंगात टाकले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे उत्तर कोरिया मधील लोकांना टेलिव्हिजन वर पाहण्यासाठी फक्त तीन सरकारी चॅनल्स उपलब्ध आहेत.
25) फ्रान्स मधील पैलवान आंद्रे द जॉइंट याच्याबरोबर प्रत्येक वेळी एक पोलिसवाला असतो. याच कारण म्हणजे आंद्रे दारू पिल्यानंतर नशे मध्ये कोणाच्या अंगावर पडू नये.
निष्कर्ष
आजच्या या पोस्टमध्ये आपण मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (Amazing facts in Marathi) जाणून घेतले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.